Subscribe Us

header ads

बीडमध्ये साहित्यसम्राट गौरव महोत्सव! अजिंक्य चांदणे

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये साहित्यसम्राट गौरव महोत्सव! अजिंक्य चांदणे  : राज्याला आदर्श निर्माण करुन देणाऱ्या महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल


बीड / प्रतिनिधी-: साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवार दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होणार आहे. अवघ्या राज्याला आदर्श निर्माण करुन देणाऱ्या या साहित्यसम्राट गौरव महोत्सवात विविध परिवर्तनिय कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यसम्राट गौरव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, चित्रपट निर्माता तथा निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे.बीडमध्ये साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात गुरुवार (दि.२८) रोजी होत आहे. या महोस्तवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, उदघाटक साहित्यिक डॉ. सतीश साळुंके, प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री रसिक चव्हाण, पेठ बीड विकास कृती समिती अध्यक्ष अमृत सारडा, प्रमुख उपस्थितीत अ‍ॅड. अविनाश गंडले, शिक्षक नेते उत्तम पवार, भाजपाचे सलीम जहांगीर, नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक गणेश वाघमारे, वंचितचे शिवराज बांगर, नगरसेवक विलास विधाते, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बाळू गुंजाळ, नगरसेवक मच्छिंद्र जोगदंड,  टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे बीड प्रतिनिधी महेंद्र मधुकर, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, पत्रकार संजय धुरंदरे, प्रमुख पाहुणे म्हणून वंचितचे अनिल डोंगरे, भाजपाचे अजय सवाई, वडार समाज नेते शंकर विटकर, मनोज डरफे  यांची उपस्थिती असणार आहे. तरी या साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट गौरव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, चित्रपट निर्माता तथा निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे.  



असे होणार कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवार (ता.२८) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित राष्ट्रीय लघु चित्रपट स्पर्धा. शुक्रवार (ता.२९) रोजी सायंकाळी ६ वाजता  लहुजी वस्ताद शरीरसौष्ठव स्पर्धा. शनिवार (ता.३०) रोजी सायंकाळी ५ जवाजता सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा  गाणे अण्णाभाऊंचे हा कार्यक्रम होणार आहे. आण्णाभाऊ साठे सभागृह येथे रविवार (३१) रोजी सकाळी ११ वाजता ५०० महिलांना साड्यांचे वाटप. सोमवार (ता.१) ऑगस्ट रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढली जाणार आहे.



यांच्या संकल्पनेतून महोस्तव

आंबडेकरी विचारांचा क्रांतिकारी झेंडा घेऊन निघालेले अजिंक्य चांदणे आणि चित्रपट निर्माता सतीश विटकर यांच्या संकल्पनेतून बीडमध्ये साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी कधीही असा महोत्सव झाला नसेल, अशी तयारी आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात अण्णाभाऊंच्या साहित्यावर आणि एकंदरीत त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकल्या जाणार आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा