Subscribe Us

header ads

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी मारगुडे यांची नियुक्ती

बीड स्पीड न्यूज 

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी मारगुडे यांची नियुक्ती


प्रतिनिधी । बीड -: दि.26 : राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी आण्णासाहेब मारगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया यांच्या हस्ते देण्यात आले.दैनिक सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक , लेखक, संघटक, निवेदक असलेले संदीप काळे यांनी या पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे हे या पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष म्हणून मंदार फणसे, धमेंद्र जिरे, नरेंद्र बोरलेपवार, सरचिटणीस चंद्रमोहन पुष्पाला, सह सरचिटणीस राहुल पांडे, कोषाध्यक्ष चिंतन थोरात, कार्यवाहक शंतनू डोईफोडे, संघटक सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके आणि मराठवाडा अध्यक्ष म्हणून विजय चोरडीया हे पदाधिकारी काम पहात आहेत. आता बीड जिल्ह्याची जबाबदारी पत्रकार बालाजी मारगुडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे बीड जिल्हा पत्रकार वर्तुळातून आणि सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा