Subscribe Us

header ads

नगरपरिषद कडे सफाई कामगार असुन सुद्धा कचरा टेंडर ची गरज काय?

बीड स्पीड न्यूज 



नगरपरिषद कडे सफाई कामगार असुन सुद्धा कचरा टेंडर ची गरज काय? स्वच्छता, पाणीपुरवठा चे टेंडर बंद करा, नगरपालिकेवरील भुर्दंड कमी करा-शेख रशिद

माजलगाव|प्रतिनिधी-: माजलगाव-कंत्राट सफाई कामगार नप समोर तीन महिनेचे वेतन भेटत नसल्यामुळे तीन दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे माजलगांव शहरात घाणच घाण झालेली आहे कोणीही लक्ष देत नाही. स्वच्छता व पाणीपुरवठा टेंडरच बंद करा अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी केली आहे.स्वच्छता, पाणीपुरवठा टेंडर च्या नावावर करोडोचा माल मारण्याचा डाव नपचे अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंत्यांनी मिळुन प्रयत्न करत आहे.नगरपालिकेने स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे टेंडर दिल्यानंतर या विभागात काम करणाऱ्या जवळपास ६९ कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने त्यांच्या आवाक्यात नसणारी कामे दिली गेली आहेत. त्यामुळे नगरपालिकेची अनेक कामे रखडलेली असतानाच नगरपालिकेने काही जणांच्या स्वार्थापोटी या कर्मचाऱ्यांवर महिन्याकाठी २५ लाखांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे.पाणीपुरवठा व सफाई कामगार मिळुन ६९ कर्मचारी आहे यात धातुर मातुर कामे देवुन २५ लाख रुपये उचलन्यात येत आहेत.६९ कर्मचारी यात स्वच्छताचे सफाई कामगार ५७ आहे यात सुपर वायझर ८,सफाई कामगार ४९ आहे. व पाणीपुरवठा विभागामध्ये १२कर्मचारी कामात आहेत .सफाई कामगार लोक २० ते २२ लाख रुपये पगार घेतात तर पाणीपुरवठा चे कर्मचारी ५ लाख  घेतात या दोन्ही विभागांचे सर्व कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे  ईतके कर्मचारी असुन सुद्धा अजून टेंडर घ्यायची गरज काय असा सवाल एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी विचारला आहे.करोडो चा टेंडर घेवून नगरपरिषद ला चुना लावायच काम अधिकारी करत आहेत .नगरपरिषद चे १५ ते २० कचरा गाडया जागेवर पडून आहे काही कामाचे नसुन फक्त फुकट पैसे वाया जात आहे. राज्य सरकारला पन चुना लावायच काम चालू आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छतेचे व पाणीपुरवठा चे टेंडर बंद करून कायम स्वरुपी कामगारांना कामे दयावे नसता माजलगाव नगरपरिषद समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा