Subscribe Us

header ads

बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस :राहूल वाघमारे

बीड स्पीड न्यूज 


बार्टीकडून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस :राहूल वाघमारे

आवाहन :  20 जुलैपूर्वी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावेत

बीड / प्रतिनिधी-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 20 जुलैपूर्वी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहीत अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल केल्यानंतर पात्र उमेदवारांची रविवार 31 जुलै 2022 रोजी चाळणी परीक्षा घेवून उमेदवारांची गुणानुक्रमे कोचिंगसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी स्पर्धा परिक्षा क्लासेस सुरू होणार आहेत.  बँक, रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय इत्यादी व तत्सम स्पर्धा परिक्षेच्या पदाच्या निवड झालेल्या पात्र सदरील विद्यार्थ्यांचे  प्रशिक्षण सहा महिन्याचे असेल, विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा ६ हजार रूपये विद्यावेतन तसेच निःशुल्क वाचन साहित्यासाठी ५ हजार किमतीच्या पुस्तकांच संच व ऑनलाईन स्टडी साहित्य संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी,पुणे मार्फत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण घेतले असेल अशा विद्यार्थ्यांची जरी गुणानुक्रमे निवड झालेली असली तरी त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व पुस्तकांचा संच दिला जाणार नाही. या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा तसेच अनुसूचित जातीचा असला पाहिजे. अर्जदाराचे वय वर्ष किमान 18 ते 34 वर्ष असले पाहिजे. त्याचबरोबर अर्जदार किमान इयत्ता 12 वी उतीर्ण असला पाहिजे. तरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी या मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे.  दम्यान विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सावंत प्लाझा, पहिला दुसरा मजला, मित्र नगर चौक, शिवाजीनगर बीड.येथे दाखल करावा काही अडचण असल्यास राहूल वाघमारे यांच्याशी  9960253461, केंद्रप्रमुख वावळकर यशवंत 9766866868 प्रा.अविनाश वडमारे 9588467377, सचिन काकडे 9970221823 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा