Subscribe Us

header ads

आदित्य सारडा यांना पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट

बीड स्पीड न्यूज 


आदित्य सारडा यांना पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट

 
बीड| प्रतिनिधी-:  बीड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सुभाषचंद्र सारडा यांना कॉम्प्युटर इंजिनिअरींग या शाखेतील शोध प्रंबधाला पुणे येथील भारती विद्यापीठाने १२ जुलै २०२२ रोजी   डॉक्टरेट  जाहीर केली आहे. बीड येथील  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष  आदित्य सारडा यांना  शोध प्रबंध मार्गदर्शक  डॉ. शशांक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली (अनॅलिसीसी ऑफ परफॉर्मन्स सॉफ्टवेअर डेव्हलमेंट लाईफ सायकल मॉडेल्स इम्पीमेंटेशन वीथ योटो डेटा ऑडीटींग)  हा शोध प्रबंध पुणे येथील भारती विद्यापीठात  ३१ मे २०२२ रोजी  दाखल केला होता.दरम्यान या शोध प्रबंधास बाह्य परिक्षक म्हणून  चेन्नई येथील सत्यभामा इन्स्टीट्युट ऑफ सायन्स अॅण्ड टेन्कॉलाजीचे  डॉ. इमलडा रॉसलीन , पुणे येथील  कॉलेज ऑफ इंजीनीयरींगचे  डॉ. संदीप वांजळे यांच्या आधिपत्याखाली प्रात्यक्षिक  परिक्षा घेण्यात आले. या शोध प्रबंधात आदित्य सारडा यांनी सात जागतीक पातळीवरील जरनल व दोन कॉन्फरन्स मध्ये सहभाग नोंदवला. त्याच बरोबर  ८४ संशोधन पेपरवर सखोल अभ्यास केला आहे. या शोध प्रबंधामध्ये आडाप्टीव डिसक्रीट इंटेग्रेशन टेस्टींग फॉर योटाडेटा ऑडीटींग हे मॉडेल तयार करण्यात आले असुन त्याचे नाव  आदित्य मॉडेल  आहे. आदित्य सारडा यांना पीएचडी मिळाल्या बद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एम.एम साळुंखे, कुलसचिव जी.जयकुमार , पीएचडी विभागाचे डॉ.सूर्यवंशी , वडील सुभाषचंद्र सारडा यांच्यासह कुटूंबीय, डॉ. सुहास मोहीते, डॉ. राजेंद्र मोहीते,  डॉ.पंकज कडू ,डॉ. अरूण मुंडे ,डॉ.संतोष कांबळे,डॉ.बळीराम शिंदे, डॉ. अनिल शेंडगे,   संतोष लहाने, राहुल खडके, सागर गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा