Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांनी केला तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ उद्घाटनानंतर लगेच कामाला सुरुवात

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांनी केला तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ
उद्घाटनानंतर लगेच कामाला सुरुवात



बीड दि.१५(प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक १३ या भागातील विविध रस्ता कामाचा शुभारंभ आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवार (दि.१५) रोजी केला.उद्घाटन झाल्यानंतर लगेच या कामांना सुरूवात करण्यात आली.बीड शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील काझीनगर भागातील  रेहान कलेक्शन ते खान 

यांचे घर रस्ताकाम,खान सर यांचे घर ते साई मेवाड हॉटेल पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे,शिवकमल ॲटोमोबाईल्स ते विठ्ठल मंदीर सिमेंट रस्ता नाली बांधकाम करणे,जालना रोड ते त्यागी समाज भवनाकडे जाणारा सार्वजनिक रस्त्याचे सिमेंट बांधकाम व नाली तयार करणे,संत सेवालाल चौक ते जोड सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे या कामांचे  सकाळी १० वाजता तर प्रभाग क्रमांक १३ मधील अंकुशनगर येथील वाघ यांचे घर ते राधानगरी कमान पर्यंत सिमेंट रस्ता व नाली 

बांधकाम करणे, राधानगरी कमान ते उगले यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे, आशा टॉकीज जवळील कल्याण पिंगळे (दाजी) पब्लिक स्कूल ते साळवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, माऊली नगर येथे संत वामनभाऊ व संत भगवान बाबा मंदीराजवळ नगरपालिकेच्या जागेवर सार्वजनिक सभामंडप बांधकाम करणे या कामांचे सायंकाळी ६ वाजता आ.संदीप क्षीरसागर यांनी उद्घाटन करून 

शुभारंभ केला.यांमधील प्रभाग क्रमांकसाठी १ मध्ये २ कोटी १५ लक्ष रूपये व प्रभाग क्रमांक १३ साठी १ कोटी ९४ रूपयांच्या कामांचे उद्घाटन  आ.संदीप क्षीरसागर यांनी मान्यवर, स्थानिक महीला व नागरिकांच्या हस्ते केला.यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासमवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे, जेष्ठ नेते ॲड.डी.बी.बागल,कल्याण आखाडे, वैजनाथ तांदळे आदी उपस्थित होते.उद्घाटन आणि कामाला तात्काळ सुरूवात केल्याने नागरिकांच्या बर्‍याच दिवसांपासूनच्या मागण्या पूर्ण झाल्याने नागरीकांनाकडून आ.संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा