Subscribe Us

header ads

पेठ बीड भागातील पुनर्वसन कॉलनी, शास्त्रीनगर, रेणुका नगर, रमाई कॉलनी, दुबे कॉलनी येथील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून आरोग्य सेवा पुरवा-- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


पेठ बीड भागातील पुनर्वसन कॉलनी, शास्त्रीनगर, रेणुका नगर, रमाई कॉलनी, दुबे कॉलनी येथील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून आरोग्य सेवा पुरवा-- नगरसेवक अँड विकास जोगदंड 
 


बीड (प्रतिनिधी) 15 जुलै बीड शहरातील पेठ बीड भाग हा कष्टकरी,कामगार, बहुजन बांधवांचा असून तेथील अनेक माता-भगिनी,बांधवांना मधुमेह,रक्तदाब, व इतर आजाराचा त्रास असल्याने या भागातून शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी  शंभर रुपये रिक्षा भाडे मोजावे लागते हा खर्च कष्टकरी समूहांना झेपणारा नाही एकंदरीत आरोग्य सेवे पासून कष्टकरी कामगार समूह वंचीत रहात आहे. तसेच दिवसेंदिवस या भागातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. पेठ बीड भागात नागोबा गल्ली येथे आजमितीस प्राथमिक केंद्र सुरु आहे परंतु वाढत्या लोकसंख्यमुळे तेथील सेवा अपुऱ्या पडत असल्याचे निदर्शनात येत आहे.तसेच तेथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका,मदतनीस यांचेवर देखील कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.म्हणून पेठ बीड भागातील पुनर्वसन कॉलनी, शास्त्रीनगर, रेणुका नगर, रमाई कॉलनी, दुबे कॉलनी, रामतीर्थ, हनुमान नगर येथील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे अत्यंत गरजेचे असून तेथील माता,भगिनीं, बांधवांना आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, राजेश कोकाटे,मंगेश जोगदंड, महादेव वंजारे, विष्णू गायकवाड, अक्षय कोरडे,सह आदींनी जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा