Subscribe Us

header ads

बीड शहरात प्रथमच विधवा,घटस्फोटीत,परितक्या महिलांसाठी फॅशन डिझाईन कोर्सचे मोफत प्रशिक्षण

बीड स्पीड न्यूज 

बीड शहरात प्रथमच विधवा,घटस्फोटीत,परितक्या महिलांसाठी फॅशन डिझाईन कोर्सचे मोफत प्रशिक्षण

प्रशिक्षणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा प्राचार्य अश्विनी बेद्रे यांचे आवाहन

बीड(प्रतिनिधी):-बीड शहरामध्ये प्रथमच विधवा,घटस्फोटीत,परितक्या महिलांसाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी केले आहे.
विधवा,घटस्फोटीत,परितक्या मुली व महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये कापड रंगवणे,एम्ब्रॉयडरी,बांधणी,ड्रेस डिझाईन,युनिफॉर्म शिवणे आदी विषयी सूत्रबद्ध पद्धतीने शिकवले जाणार आहे. यामुळे मुली व महिलांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. तसेच स्वावलंबी बनून उद्योजक होण्याची संधी देखील त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. सध्या संपूर्ण जगभरात कापड निर्मिती आणि कापड उद्योगाने उंच भरारी घेतली आहे. नवनवीन कपडे, डिझाईन आणि पारंपारिक वेशभूषा यालाही महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्याची गरज ओळखून बीडमध्ये प्रथमच विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांसाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या माध्यमातून फॅशन डिझाईन या कोर्सचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागी मुली व महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे.सदरील प्रशिक्षण  दि.१५ जुलै पासू सुरू होत आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड संत ज्ञानेश्वर नगर शासकीय आय.टी.आय च्या मागे येथे संपर्क साधावा किंवा मोबाईल क्रमांक 9310666652 यावर संपर्क साधून आपला प्रवेश प्रशिक्षणासाठी निश्चित करावा. या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे,प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा