Subscribe Us

header ads

मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय मिळणार? अबू आझमींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

बीड स्पीड न्यूज 


मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय मिळणार? अबू आझमींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु, 

मुंबई| शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याचे पडसाद विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशात उमटले. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अभिनंदनपर भाषण करताना उद्धव ठाकरेंवर टीका केली.जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. देशाचा महाराष्ट्राचा विकास होत असले तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावं बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावं बदलून काय संदेश दिला जात आहे. बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. पण मुस्लिमांची नावे बदलून काय म्हणायचे आहे?, असा सवाल अबू आझमींनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा