Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांनी शासनाकडे केली आर्थिक मदतीची मागणी

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांनी शासनाकडे केली आर्थिक मदतीची मागणी
गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

बीड दि.१८ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बीड व शिरूर-कासार तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला परंतु पेरणी झालेल्या सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांवर शंखी व इतर प्रकारच्या गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे केली आहे.बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर-कासार तालुक्यात पेरणी झालेल्या पिकांवर सध्या गोगलगायींचे संकट आले आहे.जुलै महीन्यात मोठा पाऊस झाला असला तरी,गोगलगायी सोयाबीनसह इतर पिकांचे उडवलेले रोपटे पुर्णतः नष्ट करत आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महोदय ,विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार,कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा