Subscribe Us

header ads

माजलगावच्या नविन मोंढा मार्केट मध्यें स्व.दादासाहेब राजंवन यांच्या नावाने प्रवेशद्वार उभे करा -होके पाटील

बीड स्पीड न्यूज 


माजलगावच्या नविन मोंढा मार्केट मध्यें स्व.दादासाहेब राजंवन यांच्या नावाने प्रवेशद्वार उभे करा -होके पाटील


माजलगाव|प्रतिनिधी-: माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शेतकऱ्यांचे कैवारी स्व.दादासाहेब राजंवन यांच्या नावाने नवीन मोंढा मार्केट यार्ड मध्ये प्रवेशद्वार बांधावे आसा ठराव घेण्यात यावा आशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नारायण होके पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सभापती संभाजी शेजुळ यांना निवेदन देऊन केली.निवेदनात ते पुढे म्हणाले कि स्व.दादासाहेब राजंवन यांनी माजलगाव तालुक्यातील तमांम शेतकरी, व्यापारी, हामाल मापाडी यांचे हित जोपासत यांच्यासाठी दूरदृष्टीने ठेऊन कसलाही स्वार्थ न सादता कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेकरिता शेकडो एकर जमीन खरेदी करून ठेवली आज त्याच जागेवर माजलगावची नविन भव्य आशी आडत व्यापर पेठ उभी आहे. त्यामुळे अश्या थोर व्यक्तीचे योगदान व निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेऊन स्व.दादासाहेब राजंवन या नावाचे भव्य प्रवेशद्वार उभे करून त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा आसे बीड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नारायण होके पाटील यावेळी म्हणाले यावेळी शेख आहेमद, दत्ता कांबळे, शेख जानुशा,  स आयास, गणेश चोरमले, शे तरबेज, श्रीनिवास शेळके, आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा