Subscribe Us

header ads

दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; चालक जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 


दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; चालक जागीच ठार

परळी|प्रतिनिधी-:  रुग्णाला सोडून - गंगाखेडकडे परत निघालेल्या रुग्णवाहिकेचा परळीच्या पुढे दगडवाडी जवळ अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागेवरच ठार झाला. हा अपघात आज बुधवारी (दि. १३) सकाळी ९ च्या सुमारास झाला.प्राथमिक माहितीनुसार, गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात असताना दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्ता सोडून खाली पलटी झाली. यात रुग्णवाहिकेचा चालक गजानन चिलगर याचा जागीच मृत्यू झाला. मयताचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा