Subscribe Us

header ads

खंडणीस नकार देणाऱ्या बेकरी चालकावर चाकूहल्ला

बीड स्पीड न्यूज 

खंडणीस नकार देणाऱ्या बेकरी चालकावर चाकूहल्ला


बीड|प्रतिनिधी-: गेल्या सहा महिन्यापासून बेकरी चालकांकडून बळजबरीने खंडीणी घेणाऱ्याला या वेळेस पैसे देण्यास नकार देताच खंडणी खोरांने बेकरी चालक दाम्पत्यांला गंभीर मारहाण केल्याची घटना सायंकाळी 7 वाजता बसस्टण्ड समोरील सागर हाईट्स मधील बँगलोर अंय्यगार बेकरीमध्ये घडली या प्रकरणी आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नूसार मल्लिकार्जुन विरेगोडा (वय-40 वर्षे, व्यवसाय - बेकरी चालक, रा. क्यातनकेरे, ता. बेलूर. जि. हसन राज्य कर्नाटक ह.मु. बीड) यांनी बीड शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची बीड बसस्थानकासमोरील सागर हाईट्स मधील बँगलोर अंय्यगार बेकरी आहे. येथे आरोपी शेख एजाज शेख अमजद हा गेल्या सहा महिन्यापासून खंडणीची मागणी करत आहे. प्रत्येक महिन्याला 500 रुपये खंडणी घेवून जात होता. काल तो खंडणी घेण्यासाठी बेकरीत आला त्यावेळी मल्लीकार्जुन यांनी त्याला खंडणी देण्यात नकार दिला. त्यावेळी 500 रुपये खंडणी दे असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व मल्लीकार्जुन सह त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली व लाथा बुक्यांनी मारहाण केली. आणि चाकूने वार केला. तो वार मल्लीकार्जुन यांनी चुकवल्याने काचेच्या फ्रिजवर लागला. फ्रिज तुटल्याने त्याची काच त्यांच्या पत्नीला लागून त्या जखमी झाल्या. यावेळी आरोपीने तेथे धुडगुस घालून त्यांच्या खिशातील 750 रुपये बेकरीच्या चाव्या आणि घराच्या चाव्या बळजबरीने घेवून गेला आणि बेकरीतील सामानाची नासधूस करत 80 हजाराचे नुकसान केले अशी फिर्याद दिल्याने त्यावरील शेख एजाज यांच्या विरोधात कलम 384, 394, 427, 323, 504, 506 भादवी सह कलम 4/27 नूसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सानप हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा