Subscribe Us

header ads

पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळू दे ! भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी बीड ते शिरूर कासार काढली पायी दिंडी


बीड स्पीड न्यूज 


पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळू दे ! भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी बीड ते शिरूर कासार काढली पायी दिंडी

बीड|प्रतिनिधी-:  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.या नव्या सरकारने विधानसभेत बहुमत देखील सिद्ध केलं. नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नवनिर्वाचित सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावं. यासाठी आता बीडमधील भाजप महिला आघाडीच्या वतीने, बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढण्यात आली.आज सकाळी या दिंडीला सुरुवात झाली असून बीड- शिरूर कासार - मोहटादेवी अशी पायी दिंडी काढण्यात येत आहे. दरम्यान आम्हाला विश्वास आहे, या सरकारमध्ये नक्कीच पंकजा ताईंना मंत्रिपद मिळेल. आणि हीच भावना घेऊन साकड घालण्यासाठी, आम्ही बीडहून मोहटा देवीला पायी दिंडीच्या माध्यमातून जात आहे. अशी प्रतिक्रिया बीडच्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता धसे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा