Subscribe Us

header ads

नामांतर करुन महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला दगा दिला प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


नामांतर करुन महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला दगा दिला प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: लोकसेना संघटनेने नामांतराला विरोध करुन जाहिर निषेध व्यक्त केला असून शिवसेना, राष्ट्रवादी व कांग्रेसने  राज्यातील मुस्लिम समाजासोबत दगा फटका केलेला आहे आणि भविष्यात त्यांना याची खुप मोठी किम्मत मोजावी लागेल राज्यातील मुस्लिम समाज कांग्रेस-राष्ट्रवादीला कधी माफ करणार नाही असा इशारा  लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिलेला आहे. देशातील राज्य सरकारे असो वा केंद्र सरकार  मुस्लिमांचे धार्मिक सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातुन खच्चिकरण करण्याचा प्रयत्न करत आहे देशात न्यायलय, प्रशासन व सरकार व इलेक्ट्रॉनिक मीडिया मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर समस्यावर  जानून बुजुन दुर्लक्ष करत आहे आज लोकसेना संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त देशाचे पंतप्रधान नरेन्द भाई मोदीसह केंद्र सरकारला लोकसेना संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे नावाचा बंडखोरी वादळ सुरु होताच उद्धव ठाकरे सरकारने 

अट्टेचाळीस तासात दोन शे पेक्षा जास्त जी आर पास केले या मध्ये 29 जूनच्या मंत्री मंडळामध्ये घाई गडबड़ीने घेतलेल्या निर्णयामध्ये जे नामांतर नाट्य घडले ते पूर्णपणे अयोग्य आहे औरंगाबादचे नाव यापूर्वी बदलण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तो विषय सुप्रीम कोर्टात गेल्याने तत्कालीन केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने औरंगाबादचे नाव बदलण्याचे कारण विचारले होते त्यावेळी सरकारने कोर्टाला शपथपत्राद्वारे सांगितले होते की आम्ही भविष्यात कधी औरंगाबादचे नाव बदलणार नाही मग महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे व लोकसेना पंतप्रधान साहेबांना मागणी करते की औरंगाबाद उस्मानाबादचे नाव बदलण्यात येवू नये व घाईगडबड़ीत घेतलेले सगळे शासन निर्णय राज्यपाल यांनी रिजेक्ट करावे अशी मागणी लोकसेनाने केलेली आहे. निवेदन देताना प्रा. इलियास इनामदार, खैसर मामू, सुफियान मणियार, ॲड. कलीम काज़ी, नगरसेवक शेख बाबा, अतीख अहमद खान, समीर पटेल, नदीम मेंबर, सलीम बेग, अयाज़ अखतर, अकबर अतार, साबिर शेख, नाज़ेम बेग, सालेम भैय्या, शेख आरेफ, जीशान तम्बोली बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

                                 
                        
                           
            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा