Subscribe Us

header ads

बीडमध्ये शिवसेनेला खिंडार, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी धरली शिंदे गटाची वाट!

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये शिवसेनेला खिंडार, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी धरली शिंदे गटाची वाट!

पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा 


बीड|प्रतिनिधी-:  02 जुलै -:  बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुळुक यांच्या राजीनाम्यामुळे भविष्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे अवैध धंद्यात सामील आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवशी चंद्रकांत खैरे यांनी द्विगुणित आनंद झाल्यासारखा डान्स केला, असा गंभीर आरोप सचिन मुळक यांनी केला आहे. पुढे बोलताना मुळूक म्हणाले की, शिवसैनिक म्हणून आमची भूमिका मांडत आहोत. गेली 25 वर्षांपासून शिवसेनेत काम केले आहे. माझ्यासह बीडमधील अनेकांचा हाच निर्णय आहे. येणाऱ्या काळात ते देखील निर्णयही घेतील.बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसैनिक आहोत. त्यांचीच शिवसेना अनेक शिवसैनिकांना मान्य आहे. जिल्ह्यातील 70 टक्के आजी - माजी पदाधिकारी संपर्कात आहेत.त्यांच्यासोबत बैठक झाली असून लवकर ते देखील निर्णय घेणार असल्याचे मुळूक म्हणाले. दरम्यान, संपर्कप्रमुख आनंद जाधव संपर्क प्रमुख नव्हे तर दलाली करणारे अन अवैध धंदे करणारे आहेत. त्यांची माजलगाव येथील वाळूच्या धंद्यात भागीदारी आहे, त्याची पक्षाने चौकशी केली पाहिजे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरचे नामकरण झाल्याचा आनंद साजरा केला. मात्र त्यांना याचा नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांचा पायउतार झाल्याचा आनंद जास्त झाला, म्हणून त्यांनी दिलखुलास डान्स केला, असा गंभीर आरोपही सचिन मुळूक यांनी केलाय. आता मराठवाड्यातील शिवसैनिक देखील आता एकनाथ शिंदे यांना साथ देण्याच्या मार्गावर आहेत. असे हि सचिन मुळूक यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा