Subscribe Us

header ads

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात घरोघरी तिरंगा - परळीत उभारला 150 फूट राष्ट्रध्वज- शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई

बीड स्पीड न्यूज 


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात घरोघरी तिरंगा - परळीत उभारला 150 फूट राष्ट्रध्वज- शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई


बीड|प्रतिनिधी  दि. 13, -:  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रत्येक इमारतीवर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यात घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यात आला. विविध उपक्रमांनी जिल्हा 

राष्ट्रभक्तीच्या रंगात नाहून निघाला आहे.परळी शहरात तब्बल 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.पंचायत 

समिती अंबाजोगाई येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. तसेच घरोघरी तिरंगा अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत तहसील कार्यालय शिरूर 

कासार येथे ध्वजारोहण करण्यात आले.सर्व तहसील कार्यालयांना विद्युत रोषणाई केल्याने या इमारतींचे रूप लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषद कन्या प्रशाला, आष्टी येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हर घर तिरंगा अभियानाबाबत जन जागृती करण्यासाठी केज 

शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी यांची रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त तहसील कार्यालय, पाटोदा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राजमाता जिजाऊ प्राथमिक शाळा कडा, ता. आष्टी येथील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत भारताच्या नकाशाचे रूप तयार केले. माजलगाव तालुक्यात आजादी की दौड व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा