Subscribe Us

header ads

ए . एच . वाडिया सार्वजनिक वाचनालयास विसडम प्री स्कुल व जयहिंद इंग्लिश स्कूलची भेट

बीड स्पीड न्यूज 

ए . एच . वाडिया सार्वजनिक वाचनालयास विसडम प्री स्कुल व जयहिंद इंग्लिश स्कूलची भेट

बीड । प्रतिनिधी ए . एच . वाडिया सार्वजनिक वाचनालयास भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बीड शहरातील विसडम प्री स्कुल व जयहिंद इंग्लिश स्कूल यांनी " सफर पुस्तकांच्या जगाची " या अभियाना अंतर्गत दि . 13-08-2022 रोजी भेट दिली . अगदी नर्सरीपासून ते 5 वी पर्यंत सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी पुस्तकांचे नियोजन वाचनालयात करण्यात आले होते . यावेळी वाचनालयात उत्कृष्ट अशी सजावट देखील करण्यात आली होती . वीर छत्रपती शिवाजी महाराज , आपले बापु , झाशीची राणी , लोकमान्य , इसापनिती , हॅरी पॉटर , या सारख्या लहान मुलांसाठी असलेल्या विविध रंगबिरंगी पुस्तकांची रेलचेल 

वाचनालयाने या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती . वाचनालयाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ . अनुराग पांगरीकर व सरचिटणीस अॅड . गोविंद कासट यांनी यावेळी आलेल्या पालकांशी संवाद साधला . कार्यकारी मंडळाचे डॉ . अनुराग पांगरीकर यांनी व्यक्तीमत्व उभारण्यात वाचनाचे किती अनन्यसाधारण महत्व आहे हे पटवून सांगीतले . मोबाईल , टॅबच्या आजच्या काळात पुस्तकांचे महत्व मुलांना कळाले पाहिजे आणि त्यासोबतच शहराचे वैभवशाली ग्रंथालय जिथे सुमारे 75000 पुस्तके संग्रही आहेत याकडे आपल्या शहरातील नागरीकांना अभिमान वाटावा व त्यांची पाउले ग्रंथालयाकडे वळावीत यासाठी वाचनालयाने केलेल्या या उपक्रमाची माहिती उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना दिली . त्यासोबतच पालकांनी वाचनालयाचे सभासद होऊन ग्रंथवाचन करावे जेणेकरून आपल्या पाल्याला सुध्दा वाचनाची गोडी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले . पालक आणि मुलांसाठी यावेळी एक सेल्फी पॉईट देखील तयार करण्यात आला होता . यावेळी डॉ.अनुराग पांगरीकर यांच्या अहवानास प्रतिसाद देत तीन पालकांनी आपले सभासदत्व केले . उर्वरीत पालक देखील लवकरच सभासद होतील . 

उपस्थित पालकांनी वाचनालयाच्या अभिप्राय वहीमध्ये आपले अभिप्राय नोंदवले व वाचनालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले . सभासदत्व घेण्यासाठी जनरल सभासद ( पुस्तक ) अनामत रु .500 / - वार्षिक वर्गणी 500 / प्रवेश फी 10 / - असे एकुण 1010 / - रु . लागतील तर घरपोहंच ग्रंथसेवेसाठी अनामत रु . 500 / वार्षिक फी 1000 / - प्रवेश फी 10 / - असे एकुण 1510 / - रु.लागतील अधिक माहितीसाठी  ग्रंथपाल गणेश शेंडगे , मोबा . 9420013805 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले . वाचनालयाची वेळ सकाळी 8.00 ते 11.00 व सायं . 5.00 ते 8.30 आहे . ● सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विसडम प्री स्कुल व जयहिंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हेमंत बडवे , सौ . प्रज्ञा बडवे , सौ . सारीका गुळजकर , रसिका जाजू , विकास केरोडकर यांनी सहकार्य केले . तसेच वाचनालयाचे कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा