Subscribe Us

header ads

नवउद्योजकांना एमएसएमईचा आधार निरंजन जुवा यांचे प्रतिपादन; बीडमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा

बीड स्पीड न्यूज 


नवउद्योजकांना एमएसएमईचा आधार

निरंजन जुवा यांचे प्रतिपादन; बीडमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा

बीड : नवीन उद्योग उभारणीत सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न असतो भांडवलाचा. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचे काम केंद्र शासनाने एमएसएमईच्या माध्यमातून केले आहे. या योजनेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आधार मिळाल्याचे प्रतिपादन अहमदाबाद येथील राष्ट्रीय विशेषज्ञ व उद्योग विषयक मार्गदर्शक निरंजन जुवा-जैन यांनी केले.रोटरी क्‍लब ऑफ बीड जैन संघटना, व्यापारी महासंघाच्या वतीने हॉटेल अन्वीता येथे शनिवारी निरंजन जुवा-जैन यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, सुरज लाहोटी, संतोष सोहनी यांची प्रमुख उपस्थिती होती. निरंजन जुवा-जैन म्हणाले की, नविन उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. या योजनांच्या माध्यमातून उद्योग कसा सुरू करावा? उद्योगासाठी मिळणारे भांडवल कोठून उपलब्ध होते. उद्योगासाठीच्या सर्व सुविधा बाजार पेठ, मिळणारे कर्ज, त्यावरील सबसिडी, उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधा अशी सर्व सवस्तिर माहिती व विविध योजना त्यांनी उपस्थितांसमोर विषद केल्या. केंद्र शासनाच्या पीएमईसीपी, मुद्रा लोण योजना, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग, एमएसएमई तर महिलांसाठी स्टँडप इंडिया ही  योजना तर कृषी उत्पन्नावर आधारीत प्रक्रिया उद्योग खाद्य पदार्थ, प्रक्रिया उद्योग, वेअर हाऊस, नाबार्डच्या माध्यमातून मिळणार्या योजना कोल्ड स्टोअरेज, ट्रानस्पोटेशन, ग्रीनहाऊस याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.  यावेळी प्रोजेक्ट चेअरमन सुरज लाहोटी, प्रमोद निनाळ, व्यापारी महासंघाचे  विनोद पिंगळे, भास्कर गायकवाड, सुर्यकांत महाजन, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष जैन, सचिव अमित पगारिया, सी.ए. आदेश नहार, सुहास मुनोत यांच्यासह उद्योजक, व्यापारी, कर सल्लागार यांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा