Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयाची हर घर तिरंगा रॅली संपन्न

बीड स्पीड न्यूज 


मिल्लीया महाविद्यालयाची हर घर तिरंगा रॅली संपन्न

बीड: येथील मिल्लीया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  दिनांक 11 ऑगस्ट 2022 गुरुवार रोजी हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. हर घर तिरंगा या शासकीय उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली ची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहम्मद इलयास फाजील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगितली तसेच येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यानिमित्ताने सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आव्हान केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर विष्णू सोनवणे यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवताना व उतरवताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. सदरील रॅली महाविद्यालयातून, किल्ला मैदान बलभीम चौक, कारंजा रोड मार्गे काढण्यात आली.  या रॅली मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी, महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विष्णु सोनवणे, डॉ. संध्या बीडकर, डॉ.मोहम्मद खय्युम, सर्व प्राध्यापक वृंद,कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा