Subscribe Us

header ads

घरावर कललेला ध्वज व्यवस्थित करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


घरावर कललेला ध्वज व्यवस्थित करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

केज -: घरावर लोखंडी अँगलला लावलेला तिरंगा ध्वज वाऱ्याने कलला. आडवा होऊन किंवा खाली पडून तिरंगा ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून ३० वर्षीय मुख्तारने छतावर धाव घेतली आणि ध्वज व्यवस्थित करू लागला. मात्र, ध्वज व्यवस्थित करताना घराजवळून गेलेल्या विद्युत तारेतील विजेच्या धक्क्याने मुख्तारचा मृत्यू झाला. ही घटना वरपगाव (ता. केज) येथे १३ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.मुख्तार शेख असे या तरुणाचे नाव आहे. केज तालुक्यातील वरपगाव येथील मुख्तारने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्याचे कुटुंब शेतात पत्र्याच्या वास्तव्यास असून त्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतरांप्रमाणे १३ ऑगस्ट रोजी घरावर लोखंडी अँगलला तिरंगा ध्वज लावला होता. दुपारी १२.३० ते वाजेच्या दरम्यान तो कळंबकडे निघाला असता त्याला घरावर लावलेला झेंडा कललेला दिसला. आडवा होऊन किंवा खाली पडून तिरंगा ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून तो व्यवस्थित करण्यासाठी गेला असता घराजवळून गेलेल्या विद्युत तारेला लोखंडी अँगलचा स्पर्श झाल्याने मुख्तारला विजेचा शॉक बसला. त्याला उपचारासाठी घेऊन येत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचोलीमाळी
बिटचे जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी रुग्णालयात धाव घेऊन शवविच्छेदन करून घेतले. याप्रकरणी केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्वत्र अमृत महोत्सवाची धूम असताना शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा