Subscribe Us

header ads

जिजाऊ विद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न.....

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई/ प्रतिनिधी शेख फिरोज

जिजाऊ विद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न.....




अंबाजोगाई/ प्रतिनिधी -:शहरातील विवेकानंद नगर भागातील जिजाऊ विद्यालय या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ  यीन चे कृषी व आरोग्य मंत्री  अविनाश धायगुडे व सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिरेकर तर अध्यक्षस्थानी जिजाऊ विद्यालयाचे संस्थापक ॲड.दयानंद लोंढाळ उपस्थित होते. धायगुडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर शेरेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांना गोष्टीरुपी विचार प्रकट केले. अध्यक्ष भाषणात शाळेचे अध्यक्ष लोंढाळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली मॅडम यांनी तर आभार सारिका मॅडम मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा