Subscribe Us

header ads

अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत साहित्यिक : दिलीप जगदाळे

बीड स्पीड न्यूज 


अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत साहित्यिक : दिलीप जगदाळे 

गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप


बीड / प्रतिनिधी-: साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती आहे. असे प्रतिपादन जात पडताळणी विभागाचे अध्यक्ष दिलीप जगदाळे यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले. बीड शहरातील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात सोमवार (दि.१)  रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि विद्यार्थी धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विष्णू सोनवणे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे लेखापाल रमेश पवार, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे अधीक्षक अंकुश नखाते, 

ओबीसी महामंडळाचे सोन्याबापू गुटे, विस्तार अधिकारी अंबादास चव्हाण, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे, पत्रकार सुरेश पाटोळे, हनुमंत क्षीरसागर आदी उपस्थित होते.उपस्थितांना संबोधित करतांना दिलीप जगदाळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान आहे. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली आहेत. मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. 'माणूस' हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे.असे मनोगत दिलीप जगदाळे यांनी व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विष्णू सोनवणे यांनी केले तर आभार अण्णाभाऊ साठे महामंडळाचे लेखापाल रमेश पवार यांनी मानले.


यांना देण्यात आली शिष्यवृती

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्सहानपर शिष्यवृती दिली जाते. यावर्षी निशा दादाराव लोंढे, श्रुती श्रावण थोरात, शिवजना रणदिवे या विद्यार्थिनींना शिष्यवृती योजनेचा लाभ मिळाला. या लाभाचे धनादेश साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी वाटप करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा