Subscribe Us

header ads

नागपंचमी निमित्त नागोत्सव उत्सवात साजरा

बीड स्पीड न्यूज 

नागपंचमी निमित्त नागोत्सव उत्सवात साजरा

नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पुढाकारातून दरवर्षी हजारो भाविक घेतात महाप्रसादाचा लाभ

बीड (प्रतिनिधी) 2 ऑगस्ट नागोबा गल्ली पेठ बीड येथील सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे पुरातन नागोबाचे मंदिर असून दरवर्षी नागपंचमी निमित्त या ठिकाणी नागोत्सव साजरा केला जातो विविध धार्मियांचे हे श्रद्धा स्थान असून मागील सुमारे दीडशे वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते ही परंपरा या भागाचे नगरसेवक तथा श्री क्षेत्र नागोबा देवस्थान समिती चे अँड विकासजी जोगदंड यांनी अखंडित पणे सुरु ठेवली असून या वर्षी त्यांच्या पुढाकारातून हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.नागोत्सव निमित्ताने 

धार्मिक कार्यातून सामाजिक सलोखा आबाधित राखण्याचे निस्वार्थ कार्य नगरसेवक अँड विकासजी जोगदंड हे करत असल्याने या भागातील भाविक भक्त त्यांना आशीर्वाद देत आहेत आगामी काळात या मंदिरासाठी भरीव निधीची तरतूद करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा देखील नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांचा प्रयत्न आहे.आज नागोत्सव निमित्त नागोबा मंदिर येथे विधीवत पूजन करण्यात आले या प्रसंगी देवस्थान समिती चे अँड विकासजी जोगदंड, नाना मामा कदम, मंगेश जोगदंड, कल्याणराव गाडेकर, राजू फटाले, जिवन वाघमारे,सुरज वंजारे,राजेशभाई कोकाटे, चंद्रकांत जोगदंड,महादेव वंजारे,आदर्शराजे जोगदंड,आदित्यराजे जोगदंड, सुदर्शन जोगदंड, गोरख जोगदंड सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा