Subscribe Us

header ads

वंजारवाडी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्सव सुरू जनजागृतीमुळे घरोघर फडकणार तिरंगा ध्वज

बीड स्पीड न्यूज 


वंजारवाडी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्सव सुरू जनजागृतीमुळे घरोघर फडकणार तिरंगा ध्वज




बीड, प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याचा 75 वर्धापनदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील आदर्शगाव असलेल्या वंजारवाडीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्वस मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा होणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी येथे शुक्रवारी (दि.12) भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी गावाचे प्रमुख वैजिनाथ तांदळे, ग्रामसेवक राठोड यांनी तिरंगा ध्वज फडकवण्याचे नियम, घ्यावयाची काळजी याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक, प्राणांची आहुती देणारे क्रांतीकारक यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्वस सर्वात मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा यासाठी शासन आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठया थाटात साजरा होणार आहे. विविध समाजिक आणि समाजाभीमुख उपक्रम राबवुन शासनाचे अभीयान  यशस्वी पार पाडणार्‍या बीड तालुक्यातील वंजारवाडी गावाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्सव थाटात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. घरोघर तिरंगा ध्वज फडकवला जावा, कुठेही तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी याची जनजागृती करण्यासाठीे शुक्रवारी (दि.12) सकाळी 8 वाजता वंजारवाडी येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. वंजारवाडी गावाचे प्रमुख वैजिनाथ तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या रॅलीत ग्रामस्थ, महिला, युवक, शाळकरी मुले हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते.  यावेळी वैजिनाथ तांदळे, ग्रामसेवक राठोड यांनी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तिरंगा ध्वज फडकवताना घ्यावयाची काळजी, ध्वजारोहनाचे नियम सांगीतले.  रॅलीत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ पांडुरंग राख, तात्याराम तांदळे, सुदाम पवार, अंगद महाराज, बाबासाहेब तांदळे, सुग्रिव तांदळे, लक्ष्मन तांदळे, राम पवार, अशोक टेलर, नंदु पवळ, ओमकार कांबळे यांच्यासह महिला, शाळकरी मुलांची मोठी उपस्थिती होती.

कायम स्मरणात राहणारा उत्सव
साजरा करणार: वैजिनाथ तांदळे


स्वातंत्र्य दिन हा भारतातील सर्वात मोठा सन आहे. स्वातंत्र्याला 75 पुर्ण होत असल्याने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन हा आजपर्यंतचा सर्वात मोठा उत्सव बनला आहे. यामुळे वंजारवाडी गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील अशा थाटात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती गावाचे प्रमुख वैजिनाथ तांदळे यांनी दिली.

 बीड : तालुक्यातील वंजारवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची जनजागृती करण्यासाठी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी वैजिनाथ तांदळे, ग्रामसेवक राठोव व ग्रामस्थ. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा