Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथील जि. प. प्रा. शाळेत आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रध्वज वाटप

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


वाकनाथपुर येथील जि. प. प्रा. शाळेत आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रध्वज वाटप



वाकनाथपुर प्रतिनिधी-: भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने आजादी का अमृत महोत्सव हा  तेरा ते पंधरा तारखेपर्यंत सर्व घरावर तिरंगा फडकाऊन हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. या निमित्त आज दि.12/08/2022 रोजी जि.प.प्रा.शा. उर्दू/मराठी वाकनाथपुर या शाळेत आझादी का अमृत महोत्सव या 

कार्यक्रमा निमित्त दोन्ही शाळेच्या मु.अ. श्री शेख जलील सर व श्री गावडे सर यांच्या तर्फे सर्व पालकांना, आपल्या बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री माटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व खांडेपार गांव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भोंडवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय तिरंगी झेंडे वाटप करण्यात आले. श्री माटे साहेब यांनी आझादी का 

अमृत महोत्सव या कार्यक्रमा चे नियम व अटी या बद्धल मार्गदर्शन केले. आणि श्री भोंडवे सर यांनी आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाची माहिती आणि महोत्त्व पटवून दिले. श्री जलील सर यांनी आपल्या देशाचे स्वतंत्रविर यांच्या बद्धल माहिती सांगितली.श्री गावडे सर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला मराठी शालेय 

शिक्षण समिती चे अध्यक्ष पत्रकार नवनाथ गोरे, उपाध्यक्ष महादेव खाकरे, उर्दू शिक्षण समिती अध्यक्ष शेख खदीर भाई, सरपंच गोरख घाडगे, शिक्षण प्रेमी भागवत खाकरे, आणि सर्व पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी कलीमोद्दीन सर यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा