Subscribe Us

header ads

विनायकराव मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

बीड स्पीड न्यूज 


विनायकराव मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार


बीड -: शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १५) दुपारी बीडमध्ये अत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. आज सायंकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव बीड शहरात आणण्यात येणार असून अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.विनायकराव मेटे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात सर्व तपासण्यानंतर मेटे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पार्थिव बीडमध्ये आणण्यात येणार असून नागरिकांना अंत्यदर्शना घेता यावे यासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी बीड शहरातील कॅनॉल रोडवरील सुमित नगर येथील परिसरात मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निश्चित करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलगडे, नारायण काशीद, विनोद कवडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान, अधिकृत माहिती शिवसंग्राम भवनमधून देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा