Subscribe Us

header ads

माळापुरी येथे महावितरण पथकाची आकडेबहादरावर मोठी कारवाई

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

माळापुरी येथे महावितरण पथकाची आकडेबहादरावर मोठी कारवाई



वाकनाथपुर प्रतिनिधी-: विज पुरवठा सुरळीत सुरू  व्हावा या साठी महावितरण कंपनीचे कर्मचारी रात्रंदिवस पाणी पाऊस न बघता आपले काम करत असतात पण काही गावात विज चोरीचे प्रमाण खूप वाढले आहेत. आणि त्यातच भर म्हणजे हीटर आणि शेगडी चे प्रमाण भरपूर वाढल्याने विज पुरवठा सुरळीत सुरू राहत नाही याची दाखल घेतं महावितरण पेडगाव पथक कार्यालयाची माळापुरी गावामध्ये आकडेबहादरांवर मोठी कारवाई केली आहे. सदर गावांमध्ये शेगडी व हिटर चे प्रमाण वारंवार वाढत असल्यामुळे सदर गावातील सिंगल फेज ट्रांसफार्मर वारंवार जळत होते तरी महावितरण कार्यालयातील पेंडगाव पथक येथील कर्मचारी व अधिकारी श्री कुलकर्णी साहेब .शिंदे साहेब. तागड साहेब. बरे साहेब .मस्के साहेब. कागदे साहेब .जाधव साहेब. आमटे मॅडम ई.कर्मचारी यांनी आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. आणि गावातील खुप प्रमाणात हीटर आणि शेगडी जप्त करण्यात आल्या कारवाई झाल्याने आता विज पुरवठा सुरळीत होईल या मुळे माळापुरी येथील नागरीक सर्वचे आभार व्यक्त करत आहेत. ही मोहीम सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या राबवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा