Subscribe Us

header ads

विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 

विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा; संभाजीराजेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड -: शिवसंग्राम संघटनेला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.शिवसंग्राम संघटनेला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (21 ऑगस्ट) विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळा दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी कुटुंबीयांसोबत चर्चा करताना सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा