Subscribe Us

header ads

लंपी स्किन डिसीज या जनावरांमधील संसर्ग रोगामुळे जिल्ह्यात निर्बंधांबरोबरच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड स्पीड न्यूज 


लंपी स्किन डिसीज या जनावरांमधील संसर्ग रोगामुळे जिल्ह्यात निर्बंधांबरोबरच

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा


 

जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास 1962 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहन


बीड | प्रतिनिधी  दि. 10 -: लंपी स्किन डिसीज या जनावरांमध्ये आढळणाऱ्या संसर्ग रोगाचा फैलाव होत असल्याने तो प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंधांबरोबरच उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यात 23 जनावरांमध्ये या रोगाचे लक्षणे आढळून आली असली तरीही कोणतेही जनावर दगावलेले नाही असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज सांगितले.लंपी स्कीन डिसीज या जनावरांमध्ये आढळणाऱ्या आजारात वरील उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी संवाद साधला यावेळी याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विजय देशमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले आष्टी तालुक्यातील नऊ गावे शिरूर तालुक्यातील दोन आंबेजोगाई, केज व बीड तालुक्यातील  प्रत्येकी एक गावात जनावरांमध्ये सदर रोगाचे लागण झाल्याचे दिसून आल्याने तातडीने उपाययोजना करण्यात आली आहे. या गावांपासून पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांना लसीकरण केले जाणार आहे. इतर तालुक्यात जनावरांमध्ये हा आजार आढळून आला नसला तरीही सतर्कता बाळगणे गरजेचे असून जनावरांचे मालक व शेतकरी यांनी याबाबत काही लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1962  आणि टोल फ्री क्रमांक  18 00 233 0 418 या क्रमांकावर माहिती द्यावी म्हणजे या जनावरांवर तातडीने उपचार केले जातील शासनामार्फत सदर लसीकरण आणि उपचार पूर्णपणे मोफत असून त्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही असे जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी सांगितले ते पुढे म्हणाले जिल्ह्यातील गाय संवर्ग मोठ्या जनावरांमध्ये फक्त हा आजार आढळून आला आहे जिल्ह्यात एकूण 496368 गोवंश जनावरे आहेत. राज्य शासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले असून जनावरांचे बाजार व वाहतूक यावर पूर्ण बंदी घातली आहे . जिल्ह्यात देखील अंमलबजावणी केली जात आहे. बीड जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा व लसीकरण लसीची उपलब्धता आहे. लस दिल्यानंतर दहा ते 24 दिवसात जरी या आजाराची लक्षणे आढळले तरी जनावरांवर उपचार करून घ्यावेत. जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाकडून सर्व गावांमध्ये उपाययोजनांसाठी कार्यवाही केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी जनावरे ही कुटुंबातील एक सदस्य सारखे असून त्यांच्यामध्ये हा आजार येऊ नये यासाठी गोठ्यांची स्वच्छता, औषध फवारणी याकडे लक्ष दिले जावे, असे जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोळंके म्हणाले जिल्ह्यातील 250 ग्रामपंचायत मध्ये औषध फवारणी बाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गाव पातळीवरील यंत्रणेला यापूर्वी सूचना देऊन सतर्क करण्यात आले असून आवश्यक ते कार्यवाही तातडीने केली जात आहे . शेतकऱ्यांनी "माझा गोठा माझी जबाबदारी" मानून काळजी घेतल्यास धोका राहणार नाही.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री देशमुख यांनी सांगितले की, सदर जनावरांमधील साथीच्या नियंत्रणासाठी विभागाच्या वतीने तातडीने काम केले जात आहे. जिल्ह्यात 71 हजार लस उपलब्ध होत असून लक्षणे आढळलेल्या जनावरांच्या गावापासून पाच किलोमीटर परिसरातील (एपीसेंटर) परिसरातील जनावरांना ती दिली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका, शासकीय यंत्रणेतील पशुवैद्यकीय अधिकारी, खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील सहभाग व  आवश्यक त्या सर्व उपाययोजना  केले आहेत. याबाबत व्हाट्सअप क्रमांक वर देखील आपण लक्षणे आढळल्यास कळवू शकता सदर क्रमांक 94 21 32 12 72 असा आहे असे त्यांनी सांगितले.आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, पशु संवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आले होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा