Subscribe Us

header ads

शिवाजीनगर पोलिस निरीक्षकाची चोर सोडून संन्याशाला शिवीगाळ धक्काबुक्की

बीड स्पीड न्यूज 


शिवाजीनगर पोलिस निरीक्षकाची चोर सोडून संन्याशाला शिवीगाळ धक्काबुक्की 

न्यायासाठी प्रताडीतेची आई-वडिलांसह पोलीस अधीक्षकांकडे धाव

बीड (प्रतिनिधी) -  शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे विवाहित प्रताडीता आपल्या आई-वडिलांसोबत गऱ्हाणे मांडण्यास गेली असता पोलीस निरीक्षकांनी तिच्यासह तिच्या आई-वडिलांनाही हमरीतुमरी करून शिवीगाळ करत धक्काबुक्की देऊन या सर्वांना आत मध्ये टाका असे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देऊन चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रत्यय आणून दिल्याने न्यायासाठी या सर्वांनी पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे.  
अरेरावी करणाऱ्या शिवाजी नगर पोलीस ठाणे  निरीक्षकासह त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन पाहण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन या सर्व प्रकरणाची शहानिशा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. असे दिलेल्या निवेदनात या घटनेनंतर प्रताडीता अमरीन सोहिल इनामदार हिने म्हटले  आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात सदरील प्रताडीतेने तिच्यावर लग्नानंतर ते आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला असून तिला कायद्याने न्याय मिळावा यासाठी ती गेल्या तीन वर्षांपासून पोलीस विभागाचे उंबरे झिजवत आहे. एवढा मोठा कालावधी उलटूनही दोषी असलेले सासरकडील सासू-सासरे, पती, दीर, ननंद आणि काझींकडून झालेला अन्याय दूर करून न्याय द्यावा असा टाहो फोडत आहे. परंतु शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून अद्याप पर्यंतही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने काही दिवसांपूर्वी प्रताडीतेने या प्रकरणात लक्ष घालावे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनातून म्हणणे मांडले होते. ही बाब शिवाजीनगर पोलीस ठाणे निरीक्षकांना माहीत झाल्यावर सदरील प्रताडीता व तिचे आई-वडील पोलीस ठाण्यात याविषयी चौकशी करण्याकरिता गेले असता त्यांना पोलीस ठाणे निरीक्षकासह इतर पोलिसांकडून हमरीतुमरी, शिवीगाळ व धक्काबुक्की करून हाकलून लावण्यात आले. जर हे इथून गेले नाहीत तर यांना उचलून आत मध्ये टाका असे फर्मान ही पोलीस निरीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले. या घटनेनंतर सदरील प्रताडीतेने आपल्या आई-वडिलांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मिळावा म्हणून निवेदन दिले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा