Subscribe Us

header ads

खा. प्रितमताईंनी जालना रोडचा प्रश्न मार्गी लावला तसाच नगर रोडचा प्रश्न मार्गी लावावा

बीड स्पीड न्यूज 

खा. प्रितमताईंनी जालना रोडचा प्रश्न मार्गी लावला तसाच नगर रोडचा प्रश्न मार्गी लावावा

खा. प्रितमताईंना आज निवेदन देणार - सलीम जहाँगीर

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जालना रोडचा प्रश्न मार्गी लावला. आता त्याच धर्तीवर खासदार ताईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते बालेपीर नगर रोडचा प्रश्न तातडीने मार्गी लावावाच या मागणीसाठी खा.प्रितमताईंना आज बुधवारी निवेदन देणार असल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते बालेपीर नगर रोड रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जागोजाग मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकही त्रस्त झालेले आहेत. प्रशासन प्रत्येक वेळी खड्ड्यांची डागडूजी करते मात्र आठ ते दहा दिवसात पुन्हा ते खड्डे जैसे थे होतात. सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते बालेपीर नगर रोड पर्यंत असलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. ज्या पद्धतीने खासदार प्रितमताई मुंडे यांनी जालना रोडचे काम केले. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आणि दर्जेदार सिमेंट रोड केला. त्याचप्रमाणे खासदार ताईंनी नगर रोडच्या कामासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तातडीने निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना द्याव्यात. या मागणीसाठी खासदार प्रितमताई मुंडे यांना आज बुधवार दि. 7 सप्टेंबर रोजी निवेदन देणार असल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा