Subscribe Us

header ads

उमरी मुकबधीर निवासी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची मागणी;

बीड स्पीड न्यूज 

उमरी मुकबधीर निवासी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची मागणी; अशोक हिंगे सह शिष्टमंडाची  समाज कल्याण साहाय्यक आयुक्तयांच्या कडे मागणी

बीड प्रतिनिधी/ दि.6 जनार्थ शिक्षण प्रसारक मंडळ येळेबघाट ता. जि.बीड संचलित मुकबधीर निवासी विद्यालय उमरी ता. केज जि.बीड या शाळेत कार्यरत असून आमची शाळा मा.समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी दिनांक 20.03.2020 रोजी अनुज्ञप्ती रद्द करून शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते.तरी दिनांक 28.10.2020 रोजी संस्थेने मा. सामाजिक न्याय मंत्री यांच्या दालनामध्ये अपिल दाखल केले होते. त्या अपिलावर दिनांक 20/01/2022 रोजी सुनावणी झालेली आहे. परंतु आजतागायत त्या सुनावणीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली अथवा नाही हे आम्हाला माहिती नाही. तरी मा. समाज कल्यान आयुक्त साहेबानी त्याची माहिती घ्यावी व तब्बल तीस महिन्या पासून आमचा पगार झालेला नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्यातील एका कर्मचान्याचे कुटूंब या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करून संपुष्टात आले आहे. तीच वेळ आम्हा सर्वावर येवून ठेपलेली आहे. बँकेचे जे मुलाच्या शिक्षणाची फिस आई वडीलांचे आजारपण या सर्व खर्चाना तोंड देता देता जिव नकोसा झालेला आहे.तरी समाज कल्याण अधिकारी यांनी निवेदनातील मागणीची  दखल घेवुन आम्हाला न्याय देण्यात यावा व आमचे इतरत्र कोठेही तात्काळ समायोजन करून सेवेत रुजू करून घ्यावे व आमचा आर्थिक प्रश्न सोडवावा तसेच यदाकदाचित आमच्यातील कर्मचारी यांचे काही अनुचित प्रकरण झाला तर त्याची सर्व जिम्मेदारी समाज कल्याण अधिकारी व प्रशासनावर राहील याची दखल घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे,शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील सह पुरुषोत्तम वीर, युनुस शेख,बालाजी जगतकर, व मुकबधीर शाळेचे शिक्षक  सूर्यवंशी डी.डी,खामकर आर. एन, पवार, व्ही. एस.शिंदे, बी.एस,सिरसाट पी.व्ही,लांडगे एस.जी, शिंदे एन.डी,आगलावे एस.बी, मिटकरीडी.व्ही,हिंगे एस.एन,पवार आर.जे,होके एस. जी,भंडारे ए.एन,सोळंके ए.व्ही, काळे वाय.ए,राठोड व्ही.जी,मुळे आर.डी,नलावडे आर.बी,कापरे ए.ए.आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा