Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण माह संपन्न

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण माह संपन्न

बीड: येथील  मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सॅलड डेकोरेशन स्पर्धा, डिश डेकोरेशन स्पर्धा तसेच जेंडर सेंसीटायझेशन सेल व गृहशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेव्ह द गर्ल चाइल्ड'  (save the girl child) या विषयावर पेंटिंग स्पर्धा घेण्यात आली. गृहशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. शामल जाधव यांनी  गुलझारपुरा, खासबाग येथील अंगणवाडीमध्ये स्तनदा मातांना स्तन  पानाचे महत्त्व, आहार आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन करताना निरोगी आयुष्यासाठी आहाराचे महत्व सांगितले. आरोग्य हीच संपत्ती असून कॅल्शियम व हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी ऋतुनिहाय योग्य आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले. तसेच अंगणवाडीतील बालकांना आणि मातांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्राध्यापिका डॉ.शेख एजाज परवीन, विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य सय्यद एच.के, उपप्राचार्य हुसैनी एस. एस.,आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.अब्दुल अनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा