Subscribe Us

header ads

शिंदे सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर

बीड स्पीड न्यूज 



शिंदे सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर



मुंबई | नविन पालकमंत्री यांची जिल्हानिहाय यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला. भंडारा, गडचिरोली, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नियोजन मंत्री म्हणुन  त्यांच्याकडे या सर्व जिल्ह्याची जबाबदार असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्यां ठाणे येथील जबाबदारी त्यांचे निकटवर्तीय असलेली शंभूराजे देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे मंत्रिमंडळातील काही सदस्यांकडे ३ तर काही सदस्यांकडे १ किंवा २ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली
विरोधकांनी गेले अनेक दिवसापासून शिंदे आणि फडणवीस सरकारला धारेवर धरले होते जिल्ह्याला पालक मंत्री नसल्यानें जिल्ह्याच्या समस्या कोण सोडविणार पालक मंत्री नसल्यानें मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते असा आरोप केला जात होता.

 पालक मंत्र्याची नावे पुढीप्रमाणे

राधाकृष्ण विखे पाटील -अहमदनगर- सोलापूर

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर गोंदिया.

चंद्रकांत दादा पाटील -पुणे

विजयकुमार गावित -नंदुरबार

गिरीश महाजन -धुळे- लातूर- नांदेड.

गुलाबराव पाटील -जळगाव -बुलढाणा

संजय राठोड- यवतमाळ- वाशिम

दादा भुसे -नाशिक

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे -औरंगाबाद 

उदय सामंत- रत्नागिरी- रायगड

तानाजी सावंत- परभणी -उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर- सिंधुदुर्ग

दीपक केसरकर- मुंबई -कोल्हापूर

अतुल सावे - बीड- जालना

शंभुराजे देसाई- सातारा. ठाणे

मंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा