Subscribe Us

header ads

परळी पंचायत समितीच्या विरोधात दोन ऑक्टोबर रोजी समाज कल्याण कार्यालयापुढे आमरण उपोषण-- बालासाहेब जगतकर.

बीड स्पीड न्यूज 


परळी पंचायत समितीच्या विरोधात दोन ऑक्टोबर रोजी समाज कल्याण कार्यालयापुढे आमरण उपोषण-- बालासाहेब जगतकर.                           

परळी प्रतिनिधी -: परळी पंचायत समितीच्या विरोधात 2 ऑक्टोबर 2022 रोजी समाज कल्याण कार्यालय बीड येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यात शासनाने दलितांच्या वस्तीचा विकास व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास या योजनेअंतर्गत निधी दिला जातो व तो निधी फक्त दलित वस्तीतच वापर करावा लागतो परंतु असे होताना दिसत नसल्याकारणाने आम्ही परळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना सदरील योजना अंतर्गत केलेल्या कामाची माहिती एकूण आलेला निधी एकूण वापर झालेल्या निधीची माहिती व त्यावरील फलकाची माहिती देण्यात यावी असे लेखी निवेदन दिनांक 24 5 2022 रोजी दिली असता त्यांनी कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने दिनांक 15 /6 /2022 रोजी परळी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनाच्या प्रतीसह देखील निवेदन दिले असता त्यांनीही कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनी समाज कल्याण कार्यालय बीड यांच्याकडे अर्ज वर्ग केला असून संबंधित समाज कल्याण कार्यालय कुठल्याच प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नसून त्याचेही लेखी निवेदन माननीय आयुक्त साहेब कार्यालय विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे दिनांक 7 /9 /2022 रोजी दिले असून त्यांची ही कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही 2 ऑक्टोबर 2022 रोजी समाज कल्याण कार्यालय बीड येथे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली. असल्याची माहितीही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा