Subscribe Us

header ads

पीएफआय कार्यकर्ते अटक प्रकरणी बीडच्या समाजसेवक आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


पीएफआय कार्यकर्ते अटक प्रकरणी बीडच्या समाजसेवक आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: दोन दिवसापूर्वी संपूर्ण भारतामध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया संघटनेच्या कार्यालयावर एन आय ए व ए टी एस कर्मचाऱ्यांनी छापेमारी केली व अनेक निर्दोष युवकांना नाहक़ अटक केली या घटनेचा लोकसेना पार्टी जाहिर निषेध करत आहे व ही कारवाई का केली हे सम्बंधितांनी तात्काळ जाहिर करावे कारण पॉपुलर फ्रंट संघटना ही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे कोरोना काळात नातेवाईक कोरोना पेशंट जवळ जात नव्हते पण हेच पॉपुलर संघटना होती ज्याने त्यांची सेवा केली, मेलेल्या व्यक्तिचें अंतिम संस्कार केले मौत मट्टी केली, पावसाळ्यात पुरग्रस्त परिस्थितीमध्ये मदतीचे काम करत आहे, रक्तदान शिबिर घेत आहे, मरेथॉन स्पर्धा, स्वछता अभियान, नशामुक्ति रैली अशा अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडियाचा आपणास बघावयास मिळतो भाजपा सरकार भारतामध्ये सत्तेवर आल्यापासून व नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून एका विशिष्ट धर्माला व धर्माच्या सामाजिक संघटनांना, धार्मिक स्थळान्ना, शैक्षणिक व धार्मिक संस्थाना धर्मगुरुंना सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रामावर एक प्रकारे गदा आनण्याचा काम करत आहे विशेष म्हणजे देशातील हिंदू बांधवाना ख़ुश करण्यासाठी व त्यांचे निवडणूकी मध्ये मते मिळविण्यासाठी देशातील मुस्लिम समाजाला विनाकारण कोणत्या ना कोणत्या करणाने त्रास देण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे देशाच्या तपास यंत्रणेचा गैरवापर करताना दिसत आहे. देश एकसंघ रहावा देशाची एकता अखंडता कायम रहावी लोकशाही जिवंत रहावी म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात कोणावरही विनाकारण कार्यवाही होवू नये अटक होवू नये, दोन दिवसापूर्वी संपूर्ण भारतामध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया संघटनेच्या कार्यालयावर एन आय ए व ए टी एस कर्मचाऱ्यांनी छापेमारी केली व अनेक निर्दोष युवकांना नाहक़ अटक केलीली आहे याविरोधात शुक्रवारी बीडमध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते हे आंदोलन लोकशाही मार्गाने व शांततेने झाले या आंदोलनामध्ये शहरातील प्रमुख नेते, धर्मगुरु व समाजसेवक शामिल होते त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने परवानगी नसल्याचा ठपका ठेवून सगळ्यावर गुन्हे दाखल केलेले आहे लोकसेना पार्टी बीड जिल्हाधिकारी साहेब, बीड पोलिस अधीक्षक साहेब व सम्बंधित पोलिस स्टेशनला  निवेदनाद्वारे मागणी करत आहे समाजसेवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे व सर्वांना भविष्यात परवानगी शिवाय कोणतेही आंदोलन करू नये समज म्हणून नोटिस बजवावी व त्यांच्याकडून लेखी लिहून घेवून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे. अशी मागणी पोलिस अधीक्षक साहेब बीड व जिल्हाधिकारी साहेब बीड यांना लोकसेना पार्टी निवेदनाद्वारे करत आहे.

                                
                   
         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा