Subscribe Us

header ads

हीटर ची टाकी फुटल्याने महिलेचा भाजुन मृत्यु!

बीड स्पीड न्यूज 

हीटर ची टाकी फुटल्याने महिलेचा भाजुन मृत्यु!

दिंद्रुड |  पाणी गरम करण्यासाठी अनेक घरात हीटर वापरले जाते परंतु या हीटर मुळे अनेक अपघात होत आहे. दिंद्रुड नाजिक असलेली पिंपळगाव ( ना ) ता. माजलगाव येथील महीला (उषा रंजीत सुरवसे वय ३१ वर्ष) ही महीला १९ ऑगस्ट रोजी रात्री पाणी गरम करण्यासाठी हीटर चालु करुन झोपी गेली. रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान पाणी जास्त गरम झाल्याने प्लास्टिक ची टाकी फुटली टाकीच्या बाजूला महिला झोपलेली असल्याने सर्व उकळलेले पाणी महिलेच्या अंगावर आणि अंगाखाली आले. पाणी उकळलेले असल्याने उषा रंजीत सुरवसे ही गंभीररित्या भाजली जखमी उषा हिला तत्काळ आंबेजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी उषा रंजीत सुरवसे हीची प्राणज्योत मावळली मयत उषा यांच्या  पश्चात पती. तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा