Subscribe Us

header ads

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे कलावंत गोरक्ष शेळके यांच्या मागणीचा विचार करतील का?

बीड स्पीड न्यूज 


मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे कलावंत गोरक्ष शेळके यांच्या मागणीचा विचार करतील का?

12 पैकी एक जागा कलवंत कोट्यातील बीड ला द्यावी - गोरख शेळके

बीड (प्रतिनिधी) दि.21 नवीन सत्ता स्थापन होऊन जवळपास बराच कालावधी लोटला आहे यामध्ये ना.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस झाले आहेत, व त्यांनी कामाला सुरुवात केली आहे अनेक प्रश्न हातात घेतले आहेत, त्यांनी विविध योजना व रखडलेल्या योजना यांना निधी पाठण्याचे काम सुरू केले आहे परंतु केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांचा दौरा काही दिवसापूर्वी झाला त्यावेळेसच असं चर्चा होती की महाराष्ट्रातील बारा विधान परिषदेच्या जागा देखील या दौऱ्यात जाहीर होतील किंवा विधान परिषदेचे आमदार निवडले जातील परंतु तसं काही झालेले नाही, बीड जिल्ह्यातील कलावंत गोरख शेळके हे शासनाकडून मिळणाऱ्या कलावंत मानधनाचे मानकरी आहेत त्यांना दर महिन्याला कलावंतांचे राज्याचे व देशाचे मिळते, 12 पैकी एक विधान परिषद जागा ही कलावंतांसाठी राखीव असते यामध्ये त्यांचा विचार केला जावा अशा मागणीसाठी त्यांनी प्रत्यक्ष मुंबई येथे राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोसारी यांना  निवेदन दिले आहे व ते दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते या मागणीचा मुख्यमंत्री सहानुभूती पूर्वक विचार करतील का ? बीड जिल्ह्याला एक विधान परिषद सदस्य कलावंत गोरख शेळके यांच्या रूपाने मिळेल का ?असा प्रश्न गोरख शेळके यांच्या माध्यमातून विचारला जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे निर्णय घेण्यामध्ये अव्वल क्रमांकाचे आहेत त्यांचे निर्णय घेतल्याच्या गतीवरून हे लक्षात येते म्हणून अपेक्षा आहे बारा पैकी कलावंत कोट्यातील एक जागा गोरख शेळके च्या रूपाने बीडला मिळेल का? याप्रकरणी निवेदन घेऊन कलावंत गोरख शेळके स्वतःआष्टीला उद्या त्यांची भेट घेणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा