Subscribe Us

header ads

नरसोबा नगर बनले समस्येचे माहेरघर - वंचित चे शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


नरसोबा नगर बनले समस्येचे माहेरघर - वंचित चे शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड

नरसोबा नगर तात्काळ खड्डे मुक्त रस्ते करा अन्यथा करणार न.प.समोर नागरिकान घेऊन ढोलकी बजाव आंदोलन - लखन जोगदंड

बीड (प्रतिनिधी)  दि.21बीड शहरात व परिसरात दोन दिवसा पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे या पावसामुळे नरसोबा नगर येथे सकल भागात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत नाल्यानाहीत त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये पाणी व चिखल निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकाला या रस्त्यावरून चालता देखील येत नाही ते तात्काळ येथील प्रस्थापित व पूर्वपार पर्यंत सत्तेत आलेले सत्ताधीश व सध्याचे प्रशासक ढाकणे यांनी लक्ष देऊन रोड व चे नाली कामे करावीत अन्यथा लवकरच नगर परिषदेसमोर, या भागातील नागरिकांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ढोलकी बजाव आंदोलन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड यांनी दिली आहे.लोकप्रतिनिधी फक्त या भागाला मते मागण्यासाठी प्रचार दौरा करतात त्यामध्ये विद्यमान आमदार माजी आमदार तथा मंत्री माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक हे सर्व येतात परंतु त्यांना या ठिकाणच्या नागरिक समस्या दिसत नाहीत तात्काळ नरसोबा नगर येथील नाल्याचा व रस्त्याचा प्रश्न सोडवला तर ठीक आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने नगर परिषदे ढोलकी बजाव समोर आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड यांनी दिला आहे. या भागातील सर्व नागरिक या आंदोलनात सहभागी होतील त्यामुळे तात्काळ नगरपालिका प्रशासकाने या भागाचा प्रश्न मार्गी लावावा असे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा