Subscribe Us

header ads

राजीव नगर पाणी इन्चार्ज अधिकारी किसन हाडुळे यांची बीड स्पीड च्या पत्रकाराला अरेरावीची भाषा!

बीड स्पीड न्यूज 


राजीव नगर पाणी इन्चार्ज अधिकारी किसन हाडुळे यांची बीड स्पीड च्या पत्रकाराला अरेरावीची भाषा!

बीड | प्रतिनिधी -: बीड येथील बरेच अधिकारी यांना काही कामाबाबतीत विचारताना अरेरावीची भाषा वापरत आहेत. कोणालाही काही समजुन सांगत नाहीत नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या सोडुन जे काही माहिती विचारतात त्यांच्या सोबत अरेरावीची भाषा वापरतात आज बुधवार रोजी बीड शहरातील राजीव नगर भागात पाण्याची गरज असल्याने पाणी इन्चार्ज अधिकारी किसन हाडुळे यांना बीड स्पीड चे पत्रकार यांनी फोन करुन पाणी कधी सुटणार याची माहिती विचारली असता पाणी इन्चार्ज अधिकारी किसन हाडूळे यांनी आत्ता अंकुश नगरचा पाणी सुरू आहे ते पाणी बंद करून तुम्हाला सोडू का असा उत्तर दिला. माहिती देण्याचे सोडुन पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरण्यास सुरूवात केली. पत्रकार यांनी अनेक वेळा विचारुन देखील हाडूळे यांनी पत्रकारांशी फोनवर हुज्जत घातली परंतु कोणतीही महिती दिली नाही. असे अधिकारी जर पत्रकारांशी अरेरावीची भाषा करतं असतील तर सामान्य नागरिकांशी कोणती भाषा वापरत असतील ? हा मोठा प्रश्न आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी किसन हाडूळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी पत्रकारांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक