Subscribe Us

header ads

आ.संदीप भैय्यांची वचनपूर्ती शहरातील सत्तर कोटींच्या कामांचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

आ.संदीप भैय्यांची वचनपूर्ती शहरातील सत्तर कोटींच्या कामांचा शुभारंभ

बीड दि.२० (प्रतिनिधी):- जनतेला दिलेल्या वचनाची पूर्ती करत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या 70 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२०) रोजी उद्घाटन केले. आ.संदीप क्षीरसागर यांनी नेहमीच विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना तळमळीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे. सोबतच जनतेला दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्ती करत असल्याचं दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल ( करपरा नदीपुल ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, बार्शी रोड-दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, कासट-शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, मसरत नगर-नेत्रधाम- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,पेठ बीड पोलीस 

स्टेशन-इदगाह-नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ,बार्शी रोड-मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड ( लेंडी नाका ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,अंकुश नगर ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम 

करणे, शितल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजुचे रस्ते सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशी एकूण ७० कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करून आ.संदीप क्षीरसागर यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व स्थानिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा