Subscribe Us

header ads

दत्ता देशमुख यांचा डॉ. ना. भी. परुळेकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मान

बीड स्पीड न्यूज 


दत्ता देशमुख यांचा डॉ. ना. भी. परुळेकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मान

बीड, दि. २२ (प्रतिनिधी) : येथील ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांचा ‘सकाळ’तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय डॉ. ना. भी. परुळेकर स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मंगळवारी (दि. २०) डॉ. परुळेकर यांच्या जयंती दिनी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदीरात द. प्रिंटचे संस्थापक संपादक शेखर गुप्ता यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी ‘सकाळ’ समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस आदी उपस्थित होते.सकाळचे संस्थापक संपादक डॉ. ना. भी. परुळेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावाने मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून स्वातंत्र सैनिक तथा जेष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. सकाळचे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना सरकारतर्फे दहा लाख रुपयांची मदत व सरकारी नोकरी देण्याची तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने घोषणा केली. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. याबात श्री. देशमुख यांनी सलग तीन वर्षे सकाळमधून या विषयी बातम्यांतून पाठपुरावा केला. अखेर राज्यभरातील ३९ कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत व राज्य परिवहन महामंडळात नोकरी मिळाली. या वृत्तमालिकेबद्दल दत्ता देशमुख यांना हा मानाचा डॉ. ना. भी. परुळेकर स्मृती पुरस्कार मिळाला. यापूर्वीही २०१८ मध्ये श्री. देशमुख यांचा याच पुरस्काराने सन्मान झालेला आहे. यापूर्वीही श्री. देशमुख यांना पत्रकारितेतील कार्याबद्दल स्वर्गीय मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, केज तालुका आदर्श पत्रकार समितीचा पुरस्कार, मुकनायक पत्रकारिता पुरस्कार आदी विविध मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा