Subscribe Us

header ads

शेखर गोरे कुटूंबियाला सरकाने दहा लाखांची मदत द्यावी; रमेश आडसकर यांची फडणवीसांकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 

शेखर गोरे कुटूंबियाला सरकाने दहा लाखांची मदत द्यावी

रमेश आडसकर यांची फडणवीसांकडे मागणी

बीड, दि. २२ (प्रतिनिधी) : तलावात बुडून मृत्यू झालेल्या डॉ. फपाळ यांचा मृतदेह शोधताना बुडून मृत्यू पावलेल्या शेखर गोरे या केआरडीएफ जवानाच्या कुटूंबियाला राज्य सरकारने दहा लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे रमेशराव आडसकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. गुरुवारी (दि. २२) श्री. आडसकर यांनी मंत्रालयात श्री. फडणवीस यांची भेट घेतली.तीन दिवसांपूर्वी माजलगाव धरणात पोहायला गेलेल्या तेलगाव येथील डॉ. दत्ता फपाळ यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक यंत्रणांना मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. त्यानंतर कोल्हापूर येथील केआरडीएचे पथक मृतदेह शोधण्यासाठी आले. यातील शेखर गोरे या जवानाचाही मृतदेह शोधताना तलावात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी (दि. २२) शेखर गोरे यांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी माजलगामध्ये मदत फेरी निघाली. याला विविध घटकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. दरम्यान, राज्य सरकारनेही शेखर गोरे कुटूंबियाला राज्य सरकारनेही दहा लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रमेश आडसकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे केली. श्री. आडसकर यांनी गुरुवारी मुंबईत श्री. फडणवीस यांची भेट घेऊन सर्व घटनेची माहितीही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा