Subscribe Us

header ads

उद्घाटनानंतर लगेच, कामांना प्रत्यक्षात सुरूवात आ.संदीप क्षीरसागरांच्या सुचनेने शहरातील विकास कामे दुसर्‍याच दिवशी सुरू

बीड स्पीड न्यूज 


उद्घाटनानंतर लगेच, कामांना प्रत्यक्षात सुरूवात
आ.संदीप क्षीरसागरांच्या सुचनेने शहरातील विकास कामे दुसर्‍याच दिवशी सुरू


बीड (प्रतिनिधी):- उद्घाटन होऊन देखील विकासकामांना कित्येक दिवस प्रत्यक्षात सुरूवात होत नाही असे अनेकवेळा समजते परंतु आ.संदीप क्षीरसागर यांच्या सुचनेने उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवशी बीड शहरातील विविध विकास कामांना बुधवार (दि.२२) व गुरूवार (दि.२२) रोजी तात्काळ सुरूवात करण्यात आली. बीड शहरामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून 

नगरोत्थान योजनेंतर्गत एकूण ७० कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. या मंजूर कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२०) रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले होते आणि संबंधित कंत्राटदारांना कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी सक्त सुचना केली होती. यावर उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवशी संबंधित कामांना प्रत्यक्षात सुरूवात करण्यात 

आली. बीड शहरातील विकास कामांचे उद्घाटन झाल्यापैकी मोंढा रोड परिसरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बार्शी रोड- दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे तसेच पिंपरगव्हाण रोड परिसरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट-कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशा एकुण तीन कामांना बुधवार (दि.२१) व गुरूवार (दि.२२) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार तात्काळ सुरूवात करण्यात आली. उद्घाटनानंतर कामांना प्रत्यक्षात लगेच सुरूवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा