Subscribe Us

header ads

खा. प्रितमताईंच्या हस्ते नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आज होणार सत्कार

बीड स्पीड न्यूज 

खा. प्रितमताईंच्या हस्ते नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आज होणार सत्कार  

सत्कार सोहळ्यास उपस्थित रहा - सलीम जहाँगीर 

बीड ( प्रतिनिधी ) नीट परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन उद्या दि.11 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या गुणगौरव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.बीड येथील भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्या वतीने उद्या रविवार दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हॉटेल गोल्डन चॉईस बार्शी रोड बीड येथे शहरातील भूमिपुत्रांचा नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार ,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के , विजय पवार , चंद्रकांत मुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्कार पात्र विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यात आला आहे मात्र कोणी राहिले असल्यास त्यांनी 9822670011 या क्रमांकावर संपर्क करावा आणि या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा