Subscribe Us

header ads

बीड जिल्हा क्रिडाधिकारी तर्फे पॉवर लिफ्टींग खेळाडूंचा भव्य सत्कार

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा क्रिडाधिकारी तर्फे पॉवर लिफ्टींग खेळाडूंचा भव्य सत्कार

बीड | प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असो. अंतर्गत महाराष्ट्र राज्य बेंच प्रेस अंजिक्यपद स्पर्धा 2022 इंदापूर (पुणे) येथे झाली. यात बीड जिल्हा पॉवर लिफ्टींग असो. आपल्या जिल्ह्याचा मान राखून भव्य दिव्य यश संपादन केले. बीड जिल्हा पॉवर लिफ्टींग असो. चे सेक्रेटरी श्री. सय्यद अमानउल्लाह सय्यद अरशियानउल्लाह यांनी अति सुक्षम वेळेत सर्व खेळाडुंना अहोरात्र जिक्रीने मशागत घेवून राज्य व राष्ट्रीय पातळीचे हर हुन्नरी अष्टपैलू स्पर्धक खेळाडू तयार केले. या मध्ये खालील विशेषतः उल्लेखनिय आहे. सन्माननीय जिल्हा क्रिडाधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख मॅडम यांनी स्वतःहून विशेष लक्षमान सन्मान देवून खेळाडूंचा व सचिव प्रशिक्षक श्री. सय्यद अमानउल्लाह, राष्ट्रीय खेळाडू साहिल शेख राज, श्रीमती प्रिया मंगेश मुंडे (सिल्वर + ब्राँझ), कु. कोमल शेंद्रे (गोल्ड + सिल्वर), चि. पंकज तावरे (गोल्ड + सिल्चर), चि.सय्यद अल्तमश (सिल्वर), चि. अत्तार (सिल्वर) या सर्वांचा शासकीय इतमामाने अति प्रचंड भव्य दिव्य दिमाखदार मराठमोळ्या पध्दतीने सत्कार केला. विशेष बाब म्हणजे खेळाडुंच्या पालकांचे देखील विशेष सत्कार करण्यात आले. श्री. डॉ. शेख राज (धानोरा, बीड) हे विशेष होय. मा. जिल्हा क्रिडाधिकारी यांनी I.B.B.F. व M.B.B.A. मुंबईचे राष्ट्रीय कोच व ऑर्गनाइजिंग सेक्रेटरी डॉ. सय्यद अरशियानउल्लाह मिसबाहउल्लाह यांच्या मनमिळावू मैत्रिय  शैलीचा खास उल्लेख व प्रशंसा करून आभार मानले गेले. या कार्यक्रमा मध्ये श्री. मंगेश मुंडे रेणू हॉस्पीटल व डॉ. सय्यद मसीह यांचे विशेष सत्कार करणेत आला. चहापान व अल्पोपहार या खमंग स्वाद घेता सभा संपन्न झाली. मा. जिल्हा क्रिडाधिकारी श्रीमती. सुहासिनी देशमुख मॅडम जो आपल्या जिल्ह्याचे खेळाडुंना विशेषतः महिला खेळाडूंना शासनाचे विविध प्रोत्साहनपर योजनांचा लाभ घेण्याचे सुचवले व त्यांना पुढील महिण्यात विशेष प्रशिक्षण देवून नविनतम कार्यशैली व प्रणाली अवगत करणेचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा