Subscribe Us

header ads

आमदार रवि राणांविरोधात किल्ले धारूर पोलिसांत तक्रार

बीड स्पीड न्यूज 

आमदार रवि राणांविरोधात किल्ले धारूर पोलिसांत तक्रार

गुन्हा दाखल करा प्रहार संघटनेची मागणी


किल्ले धारूर | प्रतीनीधी-: आमदार रवि राणा यांनी दिव्यांगाचे कैवारी आमदार बच्चु कडु यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रहार संघटना जिल्हा बीड यांच्या वतीने धारूर तहसीलचे तहसीलदार रामेश्वर स्वामी साहेब पोलिस ठाणे अंमलदार मुंडे यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली. आ. राणा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला
आ. राणा यांनी बच्चु कडु यांनी दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी आंदोलन केले नसुन सेटलमेंट केली गुहावटीला जाऊन कोट्यवधी रुपये अशा स्वरूपाचे आरोप केले. या प्रकरणी बच्चु कडु यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राणा यांनी 1 तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा बच्चु कडु यांनी दिलेला आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील प्रहार संघनेने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे, विठ्ठल मुंडे, विष्णू चोले, महादेव कागणे, बालाजी घोळवे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा