Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयातर्फे जिव्हाळा बेघर निवाराला दिवाळीनिमित्त भोजन

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयातर्फे जिव्हाळा बेघर निवाराला दिवाळीनिमित्त भोजन

बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भाजी मंडई बीड येथील जिव्हाळा बेघरनिवास केंद्राला दिवाळीनिमित्त गोड भोजन देण्यात आले. याप्रसंगी जिव्हाळाचे व्यवस्थापक श्री. राजू वंजारे यांनी निवारा विषयी माहिती दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे जिव्हाळा बेघर निवारा चालू असून, हा फक्त निवारा नसून लोकांना स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य करीत आहोत असे सांगितले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ यांनी जिव्हाळा हे अतिशय चांगले कार्य करीत असून यामध्ये 51 स्त्री- पुरुष राहत आहेत व त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे, हे एक चांगले कार्य आहे असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. मिर्झा असद बेग यांनी राष्ट्रीय सेवा योजनाचा मुख्य हेतू समाजसेवा असून, महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थी अशा कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभाग घेतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिव्हाळा निवारा संस्थाचालक श्री.अभिजीत वैद्य यांनी केले तर आभार डॉ. मिर्झा असद बेग यांनी व्यक्त केले. यावेळी श्री. कल्याण गोरे शालिनी परदेशी,श्री. यश वंजारे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथील लोकांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील  यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा