Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीचा परळी नगरपालिकेवर जवाब दो मोर्चा संपन्न.

बीड स्पीड न्यूज 


वंचित बहुजन आघाडीचा परळी नगरपालिकेवर जवाब दो मोर्चा संपन्न.      


परळी | प्रतिनिधी -: वंचित बहुजन आघाडीचा परळी नगरपालिकेवर जवाब दो मोर्चा संपन्न झाला असून हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार शाखा पठाण, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला असून या मोर्चात परळी नगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून यामध्ये दलित मुस्लिम व ओबीसीचा विकास करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा असे आव्हान हाजी साब यांनी केले. तर या मोर्चा च्या व्यासपीठावर हाजी साहब जफर ठाकूर गफारशहा खान बुरान शेख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चामध्ये परळी शहरांमधील मोहम्मदिया कॉलनी नागसेन नगर भिमानगर येथील रोड नाल्या लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच परळी शहरातील दलितांसाठी असलेल्या एकमेव समशानभूमी मधील अर्धवट राहिलेले काम लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्याचे माध्यमातून परळी नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे, जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे उपाध्यक्ष गौतम साळवे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष साहेब रोडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय गवळी, तालुका महासचिव विष्णू मुंडे, तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे, शहर प्रसिद्धीप्रमुख केशव कांबळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष शुभम सावंत, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष धम्मा शिरसागर, यांच्यासह मोहम्मदया कॉलनीतील महिला सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परळी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी आश्वासन दिल्यामुळे सदरील जवाब दो आंदोलन स्थगित करून समारोप करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा